शास्त्रज्ञांनी तयार केले मेंदू वाचणारे 'चमत्कारी' हेल्मेट! 

‘चमत्कारी हेल्मेट'चे नाव ऐकल्यावर तुमच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत असतील.

प्रश्न निर्माण झालेही पाहिजेत, कारण हे सामान्य हेल्मेट नाही.

हे असे हेल्मेट आहे, जे तुमचा मेंदू सहज वाचू शकते.

म्हणजेच मेंदूमध्ये निर्माण होणाऱ्या लहरींचे ते शब्दात भाषांतर करेल.

खरं तर, हे हेल्मेट अशा लोकांसाठी बनवले आहे, जे बोलू शकत नाहीत.

शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, एआय बेस हेल्मेट अनेक सेन्सर्सने झाकलेले असते, जे तुमच्या मेंदूला जोडतात.

शास्त्रज्ञांनी या हेल्मेटची नुकतीच 29 जणांवर चाचणी केली आहे.

त्याची अचूकता 40 टक्क्यांपर्यंत आहे, त्यात आणखी सुधारणा करण्याचे काम सुरू आहे.

हे क्रांतिकारी तंत्रज्ञान युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी सिडनीच्या टीमने सुरू केले आहे.