हनीमूनला जाताना  'या' चुका टाळा

सध्या लग्नाचे अनेक शुभमुहूर्त असून यानिमित्ताने अनेक जोडपी लग्नबंधनात अडकत आहेत.

लग्नानंतर बरेचजण हनीमूनला जाण्याचं प्लॅनिंग करतात. परंतू हनीमूनला जाताना काही चुका टाळायला हव्यात.

तुम्ही ज्या ठिकाणी हनीमूनला जाण्याचा विचार करत आहात ते ठिकाण खूप गर्दीचं नसावं.

तुम्ही ज्या ठिकाणी फिरायला जाणार आहात तेथील हवामानानुसार पॅकिंग करा.

हनीमूनला जोडप्याने एकमेकांना वेळ देणे आणि चांगल्या आठवणींची साठवण करणे गरजेचे आहे. तेव्हा जोडीदाराला सोडून सोशल मीडियावर जास्त वेळ घालवणे टाळा.

हनीमूनला तुम्ही ज्या ठिकाणी जाणार आहात येथे कोणत्या पर्यटन स्थळांवर फिरणार आहात याची योग्य प्लॅनिंग करा.

हनीमून ट्रिपसाठी जोडपी खूप पैसे खर्च करतात तेव्हा संपूर्ण वेळ हॉटेल रूमवर घालवणे टाळा आणि जोडीदारासोबत बाहेर फिरायला जा.

शक्य असल्यास लग्न झाल्याझाल्या हनीमूनला जाणे टाळा.

लग्नानंतरही काही दिवस कोणते ना कोणते विधी असतात ज्यामुळे नव दाम्पत्याला थोडा थकवा सुद्धा जाणवतो.

लग्नानंतर लगेचच हनीमूनला गेल्यावर थोडा थकवा जाणवू शकतो, परिणामी तुम्ही ते क्षण एन्जॉय करु शकणार नाही.