“पढ़ोगे लिखोगे तो बनोगे नवाब, खेलोगे कूदोगे तो होगे खराब” अशी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. खेळाविषयी आपल्या समाजाचा दृष्टिकोन दाखवणारी ही म्हण.
मात्र, हळूहळू समाजातील पालकांचा खेळाविषयी असलेला दृष्टिकोन बदलतोय.
आणि याच बदललेल्या दृष्टिकोनाचं फलित म्हणजे जालना शहरात सुरू झालेली क्रीडा प्रबोधिनी होय.
2019 मध्ये जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांच्या सहकार्याने क्रीडा प्रबोधिनीची सुरुवात झाली.
ग्रामीण भागातील तळागाळातील विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा हा या प्रबोधिनीचा उद्देश आहे.
जिल्हा परिषद शाळेतील पाच हजार शिक्षकांनी प्रत्येकी एक हजार रुपये जमा करून तब्बल एक कोटी 63 लाख रुपये जमा केले.
यातून या विद्यार्थ्यांसाठी खेळाचे साहित्य, निवासाची आणि भोजनाची व्यवस्था केली जाते.
सध्या तब्बल 100 विद्यार्थी वेगवेगळ्या खेळांचे प्रशिक्षण क्रीडा प्रबोधिनी मध्ये घेत आहेत.