तुम्ही  आयड्रॉपचा असा चुकीचा वापर करत आहात, तर सावधान

सध्या वायू प्रदूषणाचा स्तर वाढत आहे.

यामुळे डोळ्याशी संबंधित समस्या वाढत आहेत.

सोबतच मोबाईल, टीव्हीचा अधिक वापर हासुद्धा डोळ्यांसाठी हानिकारक आहे.

डोळ्याला किरकोळ दुखापत किंवा मोतीबिंदूसाठी आयड्रॉप वापरला जातो.

याबाबत थोडासाही हलगर्जीपणा खूप नुकसानदायी आहे.

कोणताही आय ड्रॉप खोलताना त्याची तारीख लिहून घ्यावी.

त्याच्या 1 महिन्यानंतर त्याचा वापर करू नये - डॉ. सुनील यादव.

सील खोलल्याच्या एका ठराविक कालावधीनंतर आयड्रॉप कंटामिनेट होतो. 

आयड्रॉपचा वापर करण्यापूर्वी हातांना सॅनिटायजर किंवा साबणाने धुवून घ्यावेत.

आयडॉपला सांगितलेल्या तापमानातच स्टोअर करावे.