प्लास्टिकच्या बॉटलने पाणी प्यायल्यावर होतील 'हे' गंभीर आजार!

प्लास्टिक बॉटल आरोग्यासाठी घातक ठरु शकतात. प्लास्टिकमध्ये खतरनाक केमिकल आणि बॅक्टेरिया असतात. 

हेल्थ एक्सपर्टच्या मते, प्लास्टिक कार्बन, हाइड्रोजन, क्लोराइडपासून बनवलं जातं. 

केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्या मते, देशात दरवर्षी 35 लाख टन प्लास्टिक कचरा निर्माण होत आहे.

प्लास्टिक बनवण्यासाठी वापरण्यात येणारं बिस्फेनॉल ए हे रसायन पॉली कार्बोनेटच्या बाटल्यांमधून लोकांच्या मूत्रात आढळून आलं.

 जेव्हा त्याचं प्रमाण वाढतं तेव्हा हृदयविकार आणि मधुमेहाचा धोका अनेक पटींनी वाढतो.

प्लास्टिकच्या बाटल्यांचा संबंध उष्णतेशी होतो तेव्हा प्लास्टिकचे कण पाण्यात उतरायला सुरुवात होतात. 

प्लास्टिकच्या बाटल्या जास्त दिवस वापरल्यावरही आरोग्याला धोका निर्माण होतो.

बाटलीबंद पाण्याच्या वापरामुळे यकृत आणि स्तनाच्या कर्करोगाचा धोकाही वाढतो.