'या' पक्ष्याचं सौंदर्य जणू स्वर्गीय!

स्वर्गीय नर्तक पक्ष्याचं व्हावं दर्शन, हे असतं प्रत्येक पक्षी निरीक्षकाचं स्वप्न.

कारण या पक्ष्याला आहे नैसर्गिक सौंदर्याची देणगी.

टेरप्सीफोन पॅराडाइज असं या पक्ष्याचं शास्त्रीय नाव.

त्याच्या डोळ्यांचा रंग काळाच, परंतु ते दिसतात भयंकर आकर्षक. डोळ्यांजवळ असतात गडद निळ्या आणि काळ्या रंगाचे कडे.

त्याची शेपूट असते शरिराच्या तुलनेत  चार पटीने लांब.

लहान-लहान किडे, माश्या, फुलपाखरू, इत्यादी त्याचं खाणं.

त्याच्या शिकारीची पद्धतही असते अनोखी. जी पाहताना तास-तासभर कंटाळत नाहीत पक्षीप्रेमी.

नर स्वर्गीय नर्तक असतो पांढऱ्या रंगाचा आणि मादा स्वर्गीय नर्तक असते चमकदार काळ्या भूरकट रंगाची.

दरी-खोऱ्यांमध्ये, नदी परिसरात घरटं बनवून राहतात हे पक्षी.