नवीन वर्षात या भेटवस्तू देणे टाळा अन्यथा

आता काही दिवसातच 2023 हे वर्ष सरुन 2024 या नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे.

अशा स्थितीमध्ये जर तुम्ही आपल्या लाइफ पार्टनरला किंवा मित्राला नवीन गिफ्ट देण्याच्या विचारात असाल तर हे वाचा.

तुम्हाला शास्त्रांच्या नियमांचे पालन करावे लागेल. अन्यथा माता लक्ष्मी तुमच्यावर रागावेल.

अयोध्येतील ज्योतिषी पंडित कल्कि राम यांनी सांगितले की, अनेकदा माहिती नसल्याने आपण चुकीचे गिफ्ट देतो.

यामुळे आपल्या जीवनावर मोठा प्रभाव पडतो.

अशा स्थितीमध्ये काही नियमांचे पालन करणे महत्त्वाचे आहे.

जोडे, चप्पल, आणि कात्री कुणालाही नवीन वर्षाला भेट देऊ नये.

घड्याळ आणि रुमाल - या दोन्ही वस्तू भेट दिल्याने नकारात्मकता वाढते आणि नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो. 

मनी प्लांट - कधीच कुणाला मनी प्लांट मागू नये आणि कुणाला भेटही देऊ नये. 

मूर्ती - नवीन वर्षाच्या प्रारंभी देवी-देवतांची मूर्ती भेट स्वरुपात देऊ नये.