Tilted Brush Stroke

अभिषेक की ऐश्वर्या, कोण आहे जास्त श्रीमंत?

ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन हे जोडपं सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत.

ऐश्वर्याच्या नेट वर्थविषयी सांगायचं तर तिची एकूण संपत्ती अभिषेकच्या संपत्तीपेक्षा अनेक पटीने जास्त आहे.

रिपोर्ट्सनुसार, ऐश्वर्या रायची एकूण संपत्ती 100 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 826 कोटी रुपये इतकी आहे.

ऐश्वर्या राय एका चित्रपटासाठी 10 ते 12 कोटी रुपये घेते. केवळ ब्रँड एंडोर्समेंटमधून ती एका वर्षात 80 ते 90 कोटी रुपये कमावते.

रिपोर्ट्सनुसार, ऐश्वर्या राय कोणत्याही ब्रँड एंडोर्समेंट शूटसाठी दिवसाला 6 ते 7 कोटी रुपये घेते.

ऐश्वर्या रायचे वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये 5 BHK अपार्टमेंट आहे. याची किंमत 21 कोटी रुपये आहे.

ऐश्वर्या रायचे वरळीत एक आलिशान अपार्टमेंट तर दुबईमध्ये एक व्हिला आहे ज्याची किंमत 15.6 कोटी रुपये आहे.

त्या तुलनेत अभिषेक बच्चनच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्याकडे 203 कोटी रुपयांची संपत्ती आहे.

अभिषेक बच्चन हा एक चांगला बिझनेसमन आहे. तो कब्बडी आणि फुटबॉलच्या दोन यशस्वी क्रीडा संघाचा मालक आहे.