उबदार कपड्यांच तिबेटी लोकांचं 30 वर्ष जुनं मार्केट!

थंडीची चाहूल लागताच आपल्याला उबदार कपड्यांची आठवण होते.

घराच्या अलमारी किंवा अडगळी पडलेले कपडे बाहेर निघू लागतात.

जालना शहरामध्ये मागील 30 वर्षांपासून तिबेटी लोक हेच उबदार कपडे विक्रीचा व्यवसाय करतात.

केवळ तीन ते चार महिने जालना शहरात येऊन हे लोक वेगवेगळ्या पॅटर्नचे कपडे शहरातील नागरिकांच्या सेवेत घेऊन येतात.

जालना शहरातील नागरिकांचा देखील या तिबेटी लोकांच्या उबदार कपड्यांना चांगला प्रतिसाद मिळतो.

पुरुषांसाठी इथे जॅकेट्स मिळेल स्वेटर मिळेल शर्ट मिळेल. हाफ स्वेटर, हाफ जॅकेट, मफलर, टोपी हातमोजे इत्यादी कपडे देखील मिळतील.

महिलांसाठी स्वेटर, स्वेटर शर्टमध्ये भरपूर प्रकारच्या व्हरायटीज आणि क्वालिटी इथे उपलब्ध आहेत.

जॅकेट एक हजार ते अडीच हजार रुपये, लेडीज जॅकेट पाचशे रुपये ते अडीच हजार रुपये, लहान मुलांसाठी अडीचशे रुपयांपासून ते पंधराशे रुपयांपर्यंत उबदार कपडे उपलब्ध आहेत.

फक्त 200 रुपयांत खरेदी करा फॅशनेबल कपडे!