प्राणप्रतिष्ठापनेसाठी राम मंदिर तयार, आता सजावट बाकी!

प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याची तारीख जसजशी जवळ येतेय, तसतसा भव्य राम मंदिराच्या बांधकामाला वेग येतोय.

उत्तर प्रदेशच्या अयोध्येतील भव्य मंदिरात येत्या  22 जानेवारी रोजी भगवान श्रीराम विराजमान होतील.

मंदिराला आता शेवटचा हात मारला जातोय. हे काम 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल.

श्रीरामांच्या गाभाऱ्यात जाण्यासाठी पाच मंडपांनंतर तीन भव्य प्रवेशद्वार बांधले जाताहेत. ज्यामध्ये राजस्थानचे व्हाईट मार्बल दगड लावण्यात आले असून सुंदर अशी नक्षी कोरली जातेय.

मंदिराच्या पहिल्या मजल्याचं काम पूर्ण झालंय. दुसऱ्या मजल्यावर स्तंभ लावण्याचं काम सुरू आहे.

फोटोत आपण मंदिरावर कोरलेलं आकर्षक असं नक्षीकाम पाहू शकता.

या राम मंदिराची भाविकांनी वर्षानुवर्षे आतुरतेने वाट पाहिली.

त्यामुळे मंदिर समितीकडून बांधकामाबाबत वेळोवेळी सोशल मीडियावरून माहिती दिली जातेय. यावरून मंदिराचं बांधकाम कुठवर आलंय हे भाविकांना कळतं.

जिथं श्रीराम विराजमान होतील, तो गाभारा पूर्णपणे तयार झाला आहे.