ख्रिस्ती बांधवांसाठी एक महत्त्वाचा आणि पवित्र सण म्हणजे नाताळ.
प्रभू येशू ख्रिस्तांचा जन्मदिवस मोठा आनंदात आणि उत्साहात सर्वत्र साजरा होत असतो.
कोल्हापुरातही ख्रिस्ती बांधवांकडून दरवर्षी जल्लोषात नाताळ किंवा ख्रिसमस साजरा केला जातो.
त्यामुळेच यंदाच्या नाताळ सणासाठी कोल्हापुरातील बाजारपेठा सजल्या आहेत.
लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत लागणाऱ्या सर्वच गोष्टी आता दुकानात उपलब्ध झाले आहेत.
कोल्हापुरातील पानलाइन म्हणून ओळख असणाऱ्या पापाची तिकटी ते कोल्हापूर महानगरपालिका इमारत या रोडवर अशी अनेक दुकाने आहेत.
यामध्ये ख्रिसमस ट्री, होली रिट, बेल्स, स्टार्स, प्रभू येशू आणि मेरीच्या सुंदर मूर्ती, देखावे, सांता क्लॉजचे मुखवटे, चांदणी, खेळणी, सांता क्लॉजचे ड्रेस आहेत.
20 रुपयांपासून ते 3000 रुपयांपर्यंत यावस्तूंची खरेदी करता येईल.