'या' देशात पाहुण्यांना जेवण देण्याची नाही प्रथा !

भारतात एखादा पाहुणा घरी आला तर त्याला पंचपक्वान खाऊ घातलं जातं. 

स्वीडनमध्ये पाहुण्यांना खायला देणं सोडा, त्यांना खायला काय आवडेल हे साधं विचारतही नाहीत. 

कारण या देशात पाहुण्यांना जेवण देण्याची प्रथा नाही. 

ही परिस्थिती फक्त स्वीडनच नाही तर इतर नॉर्डिक देशांमध्येही आहे. 

नॉर्डिक देश म्हणजे, उत्तर युरोप आणि उत्तर अटलांटिक.

यामध्ये स्वीडन, डेन्मार्क, फिनलंड, आइसलॅंड, नॉर्वे या देशांचा समावेश आहे. 

नॉर्डिक प्रथेनुसार, जुन्या काळात फक्त श्रीमंत लोकच गरजू लोकांना अन्न द्यायचे. 

आजही ही परंपरा पाळली जाते. 

आजही ही प्रथा पाळण्याचं कारण म्हणजे, ते पाहुण्यांना गरिब किंवा लहान दाखवू इच्छित नाही.