नुकतेच अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी येथे राष्ट्रीय जम्प रोप अजिंक्यपद स्पर्धा झाली.
यामध्ये जालना जिल्ह्यातील नेर जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी मोठं यश संपादन केलंय.
तब्बल नऊ सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कांस्य पदक विद्यार्थ्यांनी मिळवलंय.
या यशामुळे त्यांची आशियाई क्राडी स्पर्धेसाठी निवड झालीय.
विशेष म्हणजे महागडे रोप खरेदी करणं शक्य नसल्याने विद्यार्थ्यांनी क्लच वायरच्या सहाय्याने सराव केला.
विद्यार्थ्यांच्या या यशासाठी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.