भेट वस्तू देण्यासाठी फक्त 70 रुपयांत खरेदी करा नॅपकिन बुके

कोणताही शुभकार्य असेल किंवा समारंभ असेल तर येणारे पाहुणे हमखास भेटवस्तू घेऊन येत असतात.

त्यातही बरेच जण पुष्पगुच्छ भेट स्वरूपात देतात मात्र अशा पुष्पगुच्छ यांचा वापर फक्त कार्यक्रमावर होतो.

त्यातही बरेच जण पुष्पगुच्छ भेट स्वरूपात देतात मात्र अशा पुष्पगुच्छ यांचा वापर फक्त कार्यक्रमावर होतो.

त्यानंतर त्यातील फुले कोमेजून ते गुच्छ कचऱ्याच्या पेटीत जातात. त्यामुळेच आजकाल नॅपकिन बुकेचा ट्रेंड वाढत चाललाय.

अशातच कोल्हापुरात स्वतःची खासियत असणारे नॅपकिन बुके बनवून त्याची विक्री एक बापलेकाची जोडी करत आहे.

या ठिकाणी मिळणारे नॅपकिन बुके खरेदीसाठी लांबलांबहून ग्राहक येत असतात.

आपला स्वतःचा एक व्यवसाय सांभाळत निलेश खोले, सुनील खोले या बापलेकांनी शुभकार्यात शुभेच्छा देण्याची नवीन पद्धत कोल्हापूरकरांसाठी पहिल्यांदा आणली.

सांगरूळच्या बाजारवाडा येथे या दोघांनी स्वतः नॅपकिन बुके बनवून विकायला सुरुवात केली.

या ठिकाणी 70 रुपयांपासून 500 रुपयांपर्यंत विविध प्रकारचे नॅपकिन बुके उपलब्ध आहेत.

लग्नासाठी महागातील पार्टीवेअर साडी स्वस्तात!