महाराष्ट्रात आहे कोट्यधीश माकडांचं गाव

महाराष्ट्रात आहे कोट्यधीश माकडांचं गाव

आपल्याला वाचून आश्चर्य वाटेल पण महाराष्ट्रात कोट्यधीश माकडांचं गाव आहे. 

धाराशिव जिल्ह्यातील या गावाला माकडांचं उपळा म्हणूनच ओळखलं जातं. 

विशेष म्हणजे गावातील 33 एकर जमीन आणि दोन मजली घर माकडांच्या नावावर आहे. 

धाराशिव शहरापासून 10 किलोमीटर तर तेर पासून 15 किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. 

गावात प्राचीन काळापासून असणाऱ्या माकडांमुळेच माकडांचे उपळा हे नाव पडल्याचं सांगितलं जातं. 

सातबारा उताऱ्यावर चक्क 'समस्त माकड पंच' या नावाने 33 एकर जमीन आहे. 

ही जमीन माकडांच्या नावावर कशी आली याबद्दल मात्र काहीच माहिती नसल्याचं ग्रामस्थ सांगतात.

पूर्वी गावात जेव्हा लग्न होत तेव्हा आधी माकडांना भेटवस्तू दिली जायची, असे गावकरी सांगतात. 

वाघ नव्हे ही तर वाघाची मावशी!