ख्रिसमसची सुरुवात कशी झाली, तुम्हाला या रंजक गोष्टी माहीत आहेत?

जगभरात ख्रिसमसचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.

या दिवशी चर्च आणि घरे सुंदर सजवली जातात.

पण, ख्रिसमसची सुरुवात कशी झाली हे तुम्हाला माहीत आहे का? चला जाणून घेऊया. 

वास्तविक, दरवर्षी २५ डिसेंबरला लोक ख्रिसमसचा सण साजरा करतात.

या दिवशी येशू ख्रिस्ताचा जन्म झाला असे लोक मानतात, पण तसे नाही.

सर्व संशोधन करूनही येशू ख्रिस्ताचा जन्म कधी झाला हे कळू शकलेले नाही.

संपूर्ण इतिहासात ख्रिसमसची तारीख बदलत राहिली आणि शेवटी 25 डिसेंबरची निवड करण्यात आली.

ही तारीख धार्मिक नेते आणि चौथ्या शतकातील चर्चच्या प्रतिनिधींनी निवडली आहे.

तेव्हापासून आजतागायत ख्रिसमस म्हणजेच नाताळ हा सण 25 डिसेंबरला साजरा केला जातो.