92 वर्षांपूर्वी आलेल्या या सिनेमाची तिकिटं ब्लॅकनं विकली 

भारतातील पहिला बोलपट  'आलम आरा' हा होता.

भारतातील पहिला बोलपट  'आलम आरा' हा होता.

'आलम आरा' 14 मार्च 1931 रोजी रिलीज झाला होता.

अर्देशीर इराणी यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. १२४ मिनिटांचा हा सिनेमा होता.

या सिनेमाची कोणतीही प्रिंट अस्तित्त्वात नाही. त्यामुळे या सिनेमाला हरवलेला सिनेमा आहे असंही म्हणतात.

सिनेमाच्या पहिल्या शोसाठी रात्री 9 वाजल्यापासून लोक थिएटरबाहेर उभे राहत. 

मॅजिक थिएटरमध्ये दाखवण्यात आलेल्या या सिनेमाची तिकिटं त्यावेळस ब्लॅकनं विकण्यात आली होती. 

थिएटरबाहेरील गर्दीवर आवरण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला होता.

राजकुमार आणि एका बंजारन मुलीची लव्ह स्टोरी सिनेमा दाखवण्यात आली होती.

'आलम आरा'पूर्वी भारतात फक्त मूकपट तयार होत होते.