कारलं खाताना एक चूक ठरू शकते धोकादायक

कारलं खाताना एक चूक ठरू शकते धोकादायक

सध्याच्या काळात बदलत्या जीवनशैलीमुळे मधुमेहासारख्या आजाराचे प्रमाण वाढले आहे. 

बऱ्याचदा साखर नियंत्रणासाठी आहारात कडू भाजी म्हणून कारल्याचा समावेश केला जातो. 

कारले रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास आणि साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते. 

पण, कारले खाताना अशा चुका केल्या जातात की त्यामुळे साखर कमी होण्याऐवजी वाढते.

कारले खाताना शिजवण्याची आणि खाण्याची पद्धत बरोबर नसेल तर फायद्याऐवजी नुकसान होऊ शकते. 

जर तुम्ही पारंपारिक पध्दतीने कारले तेलात तळलात तर तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढेल. 

त्यामुळे कच्च्या कारल्याचा रस पिणं शक्य नसल्यास कारलं उकळवून खावा. 

कारल्याचे लहान तुकडे लिंबूने मॅरीनेट करा आणि त्याची सॅलड खा किंवा सूप प्या. 

कारल्याचे तेलात फ्राय केलेले चिप्स, फ्राइड कारले खाऊ नये, असा सल्ला डॉक्टर देतात.