New yearला देवदर्शन घ्यायचंय? 'या' 8 मंदिरांना द्या भेट

वर्षाचा पहिला दिवस जसा असतो तसंच पूर्ण वर्ष सरतं. म्हणूनच आपण पहिला दिवस अत्यंत आनंदात घालवण्याचा प्रयत्न करतो. अनेकजण देवदर्शनानं वर्षाची सुरुवात करतात.

मध्य प्रदेशच्या खरगोन जिल्हा मुख्यालयापासून जवळपास 50 किमी अंतरावर असलेल्या मंडलेश्वर गुहेत एक प्राचीन शिवलिंग आहे. गुहेत असल्यामुळे हे ठिकाण 'गुप्तेश्वर महादेव' या नावाने ओळखलं जातं. असं म्हणतात की, या शिवलिंगाची स्थापना स्वतः महादेवांनी ऋषींकडून मिळालेल्या शापापासून मुक्ती मिळवण्यासाठी केली होती. शिवाय हे जगातलं पहिलं शिवलिंग असल्याचं म्हटलं जातं.

खरगोनपासून 59 किमी अंतरावर पांडवकालीन शिव मंदिर आहे. या मंदिरात जवळपास 11 फूट उंच दगडाचं भव्य शिवलिंग आहे.

खरगोनपासून 59 किमी अंतरावरील महेश्वरच्या किल्ला भागात असलेलं हे शिव मंदिर त्रेता युगातलं असल्याचं म्हटलं जातं. तेव्हापासून याठिकाणी 11 दिवे अखंड सुरू आहेत. साजूक तुपाचे हे दिवे असतात.

हे मंदिर खरगोनच्या भावसार भागात आहे. जवळपास 372 वर्षांपासून ते इथं वसलंय, असं म्हटलं जातं. मध्य प्रदेशसह अनेक राज्यांतून भाविक इथं दर्शनाला येतात.

खरगोनपासून 55 किमी अंतरावर भगवानपुरा भागात असलेल्या सातपुरा पर्वताच्या टोकावर एक विशाल गुहा आहे. त्या गुहेत असलेल्या या मंदिरातील शिवलिंगावर कायम थेंब थेंब पाण्याचा अभिषेक होत असतो. 13 धबधबे पार करून लोखंडाच्या पायऱ्या चढल्यानंतर या मंदिराचं दर्शन होतं. इथंच रावणाने आपले दहा शीर महादेवांना अर्पित केले होते, असं म्हटलं जातं.

महेश्वरात नर्मदेच्या किनारी असलेल्या किल्ला भागात भगवान काशी विश्वनाथांचं हे प्राचीन मंदिर आहे. या मंदिराला गुप्त काशीदेखील म्हटलं जातं. वामन राजाने या मंदिराची स्थापना केली होती, असं म्हणतात.

खरगोनच्या विध्यांचल पर्वतापासून जवळपास दोन हजार फूट खोल घनदाट जंगलात गुहेत हे शिवलिंग आहे. जवळपास 300 पायऱ्या उतरल्यानंतर इथं देवाचं दर्शन घेता येतं.

खरगोनच्या कसरावदमध्ये श्री गांगलेश्वर महादेव हे प्राचीन मंदिर आहे. या मंदिरात असलेल्या शिवलिंगाच्या आत आणखी एक शिवलिंग दडलंय. पांडवांनीदेखील इथं पूजा केली होती, असं मानलं जातं.