प्रजासत्ताक दिनी दिल्लीत दिसणार वर्ध्याची संस्कृती

दिल्ली येथे राजपथावर येत्या 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन परेड होणार आहे.

यासाठी वर्ध्यातील जानकीदेवी बजाज विज्ञान महाविद्यालयाची विद्यार्थिनी संस्कृती गजानन पेटकर हिची निवड झाली आहे.

संस्कृती ही बी.एससी. अंतिम वर्षाचे शिक्षण घेत आहे.

विशेष म्हणजे नागपूर विद्यापीठातून आणि वर्धा जिल्ह्यातून निवड झालेली संस्कृती एकमेव विद्यार्थिनी आहे.

संस्कृती पेटकर हिचे वडील गजानन पेटकर यांनी देशासाठी माजी सैनिक म्हणून आर्मीमध्ये सेवा दिली आहे.

प्रजासत्ताक दिनी दि.26 जानेवारी रोजी दिल्ली येथील राजपथावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

त्यामध्ये याठिकाणी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने परेड करण्याचा बहुमान संस्कृती पेटकरला मिळाला आहे.

ZP शाळेच्या विद्यार्थ्यांनी जिंकलं राष्ट्रीय अजिंक्यपद