उपाशीपोटी चहा, कॉफी पिणं घातक! आजच थांबवा

चहा आणि कॉफीबाबत लोकांमध्ये अनेक समज, गैरसमज असतात.

सकाळी उठल्यानंतर चहा किंवा कॉफी प्यायल्याशिवाय अनेकांच्या दिवसाची सुरुवात होत नाही.

पुण्यातील आयुर्वेद डॉक्टर शर्वरी इनामदार सांगतात...

उपाशीपोटी चहा किंवा कॉफी पिऊ नये. कारण ते आरोग्यासाठी अत्यंत नुकसानकारक आहे.

रिकाम्यापोटी चहा प्यायल्यास पचनासह अनेक समस्या उद्भवू शकतात. 

पोटातील अ‍ॅसिड वाढतं आणि आम्ल्पित्ताचा त्रास होऊ शकतो. 

तुम्ही सकाळी उठल्यानंतर 1 किंवा 2 तासांनी चहा प्यायला तर त्यामुळे शरिराला फारशी हानी होत नाही.

खूप गरम पेय प्यायल्याने अन्ननलिकेला कर्करोगाचा धोका वाढतो, त्यामुळे खूप गरम चहा पिणं टाळा, साखरही मर्यादित वापरा.