एक असं मंदिर जिथं महिलांना मिळत नाही प्रसाद, पण का?

बिहारच्या जमुई जिल्ह्यात आहे झुमराज मंदिर.

इथं महिनाभरात दीड लाख भाविक घेतात दर्शन. मात्र आजही दिला जात नाही महिलांना प्रसाद.

पुरुषही मंदिरातच खाऊ शकतात प्रसाद. घरी नेता येत नाही.

नेमकी काय आहे परंपरा?

मंदिराचे पुजारी तलेवर सिंह सांगतात, एकदा हरिद्वारमधील काही पुजाऱ्यांचा समूह इथल्या जंगलातून जात होता. तेव्हा एका पुजाऱ्यावर वाघाने हल्ला केला, त्यात त्यांचा मृत्यू झाला. हे पाहून इतर साथीदार जीव मुठीत घेऊन निघून गेले.

अनेक दिवसांनंतर एक शेतकरी इथं शेती करायला आला. त्यानं पुजाऱ्यांचे अवशेष जाळले. जमीन साफ करून नाचणीचं पीक घेतलं. पिकाची पहिल्यांदा कापणी केली. मात्र त्यानंतर एवढं भरभरून पीक येऊ लागलं की, त्याला दररोज कापणी करावी लागली.

हे असं बऱ्याच दिवस झाल्यानंतर शेतकऱ्यानं प्रार्थना केली. तेव्हा शेतकऱ्याच्या स्वप्नात पुजारी आले. 'साथीदारांनी माझी साथ सोडली पण तू मला अग्नी दिला. मी अनेक वर्ष इथंच भटकत होतो', असं म्हणून 'मी आता प्रत्येकाची इच्छा नक्की पूर्ण करेन', असं त्यांनी सांगितलं.

त्यानंतर शेतकऱ्यासह गावकऱ्यांनी मातीची एक पिंड स्थापन करून तिची पूजा सुरू केली. हळूहळू मंदिर स्थापन झालं, मात्र आजही इथं महिलांना प्रसाद दिला जात नाही. याचं कारण मात्र कोणालाच माहित नाही.

(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)