'ति'ला पाहिलं अन् 2023 मध्ये 'या' क्रिकेटर्सची पडली विकेट

अभिनेत्री अथिया शेट्टी आणि केएल राहुल या दोघांनी २३ जानेवारी २०२३ मध्ये विवाह केला.

अक्षर पटेलयाने देखील २६ जानेवारी रोजी त्याची मैत्रीण मेहा पटेल सोबत लग्नगाठ बांधली.

हार्दिक पंड्याने त्याची पत्नी नताशा सोबत पुन्हा एकदा मोठ्या थाटामाटात विवाह केला. त्यांचा विवाह राजस्थान येथील भव्य पॅलेसमध्ये पार पडला.

लॉर्ड शार्दूल ठाकूरने देखील त्याची मैत्रीण मिताली सोबत २७ फेब्रुवारी रोजी विवाह केला.

मराठमोळा क्रिकेटर ऋतुराज गायकवाडने देखील जून २०२३ मध्ये विवाह केला. त्याचे महिला क्रिकेटर उत्कर्षा सोबत लग्नगाठ बांधली.

८ जून २०२३ रोजी बॉलर प्रसिद्ध कृष्णाने देखील त्याच्या मैत्रिणीसोबत विवाह केला.

मुकेश कुमारने देखील २८ नोव्हेंबर रोजी दिव्या सिंह सोबत विवाह केला.

CSK चा बॉलर तुषार देशपांडे याने देखील 21 डिसेंबर रोजी त्याची मैत्रीण नभा हिच्यासोबत लग्नगाठ बांधली.