चिकन भेळ कधी खाल्लीय का?

वेगवेगळ्या चटपटीत पदार्थांचा आस्वाद घ्यायला अनेकांना आवडतं. लहान असो की मोठे सर्वांना भेळ, पाणीपुरी खायला आवडते.

आजवर तुम्ही अनेक प्रकारच्या भेळ खाल्ल्या असतील पण कधी चिकन भेळ खाल्ली आहे का? नाही ना?

तर हीच भेळ आता तुम्हाला ठाण्यातील ऐका स्टॉलवर खायला मिळेल.

ठाण्याच्या अष्टविनायक चौकातील स्वादिष्ट नामक या नॉनव्हेज स्टॉलवर चिकन भेळ मिळत आहे.

या स्टॉलचे मालक ऋषभ दत्तात्रय पवार आहेत.

या चिकन भेळची किंमत 70 रुपये आहे. टेस्ट जबरदस्त आहे.

70 रुपयात मिळणाऱ्या या भेळीचे खास वैशिष्ट्य म्हणजेच यात तळलेले चिकन वापरले जाते.

पारंपारीक पद्धतीचा बटाटेवडा कधी खाल्ला आहे का?