'या' गावातील महिलांना शृंगार करायला वाटते भीती, कारण धक्कादायक!

छत्तीसगडमधील एक गाव आहे जिथे जुनी परंपरा जपली जाते. 

कोणाचा विश्वासही बसणार नाही अशी ही परंपरा आहे.

छत्तीसगडमधील सांदबहरा या गावात महिली कोणत्याही प्रकारचा मेकअप करत नाहीत.  

विवाहित स्त्रियाही भांगेत कुंकू भरत नाहीत. 

मेकअपमुळे गावात गंभीर आजार होईल, अशी भीती त्यांना वाटते.

येथील महिलांना खाटेवरही झोपायला भीती वाटते. संकट येईल असं त्यांना वाटतं.  

हे सगळं केल्यामुळे येथील टेकडीच्या करीपथ देवीला राग येईल, असं त्यांना वाटतं.

गावातील महिलांना लाकडापासून बनवलेल्या वस्तूंवर बसायला बंदी आहे.  

त्यामुळे येथील महिला वीट-सिमेंटचा वापर करतात.