आई-बाबा होण्याचं योग्य वय काय असतं?

मुलं होण्यासाठी योग्य वय काय आहे? हा स्त्रीरोगतज्ञांना सर्वाधिक विचारला जाणारा प्रश्न असतो.

काही जोडपी विविध कारणांमुळे बाळाचे नियोजन पुढे ढकलतात आणि नंतर गर्भधारणा करणे खूप कठीण होते.

तेव्हा आई वडिलांनी कोणत्या वयात मुलाला जन्माला घालावे याविषयी विज्ञान काय म्हणते हे जाणून घेऊयात.

अमेरिकन सोसायटी फॉर रिप्रॉडक्टिव्ह मेडिसिनच्या मते, पुरुष आणि स्त्रिया दोघांसाठी मूल होण्याचे सर्वोत्तम वय 20 ते 30 वर्षे आहे.

20 ते 30 वर्षे हा कालावधी प्रजननासाठी उत्तम मानला जातो. महिलांमध्ये वयाच्या 30 नंतर प्रजनन क्षमता कमी होऊ लागते.

35 ते 45 वर्षांच्या दरम्यान प्रजनन क्षमता आणखी कमी होते.

 काही पुरुष वयाच्या 60 व्या वर्षीही वडील बनू शकतात, परंतु त्यांचे शुक्राणू 30 वर्षांच्या युवकांप्रमाणे जनुकीयदृष्ट्या निरोगी असतील याची शाश्वता देता येत नाही.

स्त्रियांमध्ये देखील वयाच्या तिशीनंतर अंड्यांचा दर्जा हा 20 ते 30 वर्षांच्या स्त्रियां सारखा राहत नाही.

रजोनिवृत्तीनंतर स्त्रिया माता होऊ शकत नाहीत हे देखील लक्षात ठेवणे आवश्यक आहे. रजोनिवृत्तीचे सरासरी वय 51 वर्षे आहे.

हंगेरीतील सेमेलवेइस विद्यापीठातील संशोधकांच्या मते, मुल होण्याचे सर्वात सुरक्षित वय 23 ते 32 वर्षे असते, कारण या वयात काही जन्मजात आजार होण्याची शक्यता कमी असते.

सेमेलवेइस युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांच्या मते, एखाद्या जोडप्याने 32 वर्षांपेक्षा जास्त वय झाल्यावर मूल जन्माला घालण्याची योजना आखली, तर बाळाला अनेक आजार होण्याचा धोका 15 टक्क्यांनी वाढतो.

तसेच या वयात गरोदरपणाच्या प्रक्रियेत आईच्या जीवाला देखील 15 टक्के धोका असू शकतो.

मूल होण्यासाठी स्त्री आणि पुरुष दोघांनीही शारीरिक, मानसिक आणि भावनिकदृष्ट्या मजबूत असणे अत्यंत आवश्यक आहे.

वयाच्या तिशीनंतर, मानसिक आणि शारीरिक आरोग्य कमी होऊ लागते आणि यामुळे आई किंवा वडील होण्याची शक्यता कमी होऊ शकते.

बातमी वाचण्यासाठी हेडिंगवर किल्क करा