चक्क एकाच झाडाला 205 पपई!

फळांमधल एक आवडीच तसेच आरोग्यासाठी ही उपयुक्त असणार अस एक फळ म्हणजे पपई.

पपई ही कॅरिका पपईची वनस्पती आहे. महाराष्ट्रात देखील पपईचं पीक घेतलं जातं.

पुण्यातील एका शेतकऱ्याने लावलेल्या पपईच्या झाडाला तब्बल 205 पपई आल्या आहेत.

या एका झाडाला आलेल्या 205 पपई पाहण्यासाठी नागरिक गर्दी करत आहेत.

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील वेळू या गावातील शेतकरी गुलाब घुले यांनी साई हायटेक नर्सरी सिंगापूर येथून 35 रोपे आणली.

अर्धा फुटाचा खड्डा घेऊन कुजलेला पाला पाचोळा, शेणखत आणि माती याचे मिश्रण करून खड्डे भरून घेतले.

त्यानंतर ठिबकसिचनाद्वारे आठवड्यात एकदा अर्धा लिटर जीवामृतचा डोस दिला.

त्यांनी जीवामृतचा वापर करून पपईच्या झाडाला विक्रमी अशा 205 पपईचे उत्पादन घेतले आहे.

तेलाचा नव्हे हा तर उसाचा घाणा