दारूसोबत चुकूनही खाऊ नका 'हे' पदार्थ

दारूचे सेवन प्रत्येक दृष्टिकोनातून हानिकारक आहे. परंतू या गोष्टी माहित असून देखील बरेचजण दारूचे सेवन करतात.

केवळ दारूचं नाही तर यासोबत काहीजण स्नॅक्सचे देखील सेवन करतात ज्याला चखना असे म्हणतात.

परंतू असे काही पदार्थ आहेत जे दारू सोबत खाल्ल्यामुळे त्याचा शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतो.

दारू पिताना चणे खाल्ल्याने तुमची पचनशक्ती कमकुवत होऊ शकते

चणे आणि रेड वाईन

रेड वाईन, चणे इत्यादी एकत्र खाल्ल्यास ते नीट पचत नाही. रेड वाईनमध्ये टॅनिन असते चण्यामध्ये असलेल्या लोहाचे शोषण रोखते.

बीअरसोबत ब्रेडचे सेवन केल्याने गॅस आणि अपचनाचा त्रास होऊ शकतो.

बीयर आणि ब्रेड

बिअर आणि ब्रेड या दोन्हीमध्ये भरपूर यीस्ट असते जे पोटात सहज पचत नाही. यामुळे कैंडिडा बॅक्टेरियाची वाढ होऊ शकते.

फ्रेंच फ्राय, चीज, भुजिया इत्यादींमध्ये भरपूर सोडियम असलेले पदार्थ पचनसंस्थेसाठी चांगले नसतात

अल्कोहोलसोबत जास्त नमकीन खाणे टाळावे

खूप खारट पदार्थांच्या सेवनामुळे जास्त तहान लागते, त्यामुळे प्रमाणापेक्षा जास्त दारू प्यायल्याने डिहायड्रेशनची समस्या जाणवू शकते.

अल्कोहोल आणि चॉकलेटचे एकत्र सेवन करू नये. चॉकलेटमध्ये कॅफिन असते ज्यामुळे गॅस्ट्रोची समस्या वाढ शकते.

अल्कोहोल आणि चॉकलेट

अल्कोहोल पोट लवकर रिकामे होण्यापासून थांबवते, ज्यामुळे पोटात ऍसिड रिफलेक्स सुरु होते. 

अल्कोहोल आणि पिझ्झा

यात जर पिझ्झाला सोबत त्याला लावलेली टोमॅटोची चटणी खाल्ली गेली तर त्यामुळे पोटात गॅस होण्याची समस्या निर्माण होते.

अल्कोहोल सोबत काही पदार्थ खायचे असतील तर तुम्ही त्याच्यासोबत स्नॅक्स म्हणून सॅलेड आणि बदाम खाऊ शकता. मात्र, या गोष्टींमध्ये मीठ जास्त नसावे याची दक्षता घ्या.

बातमी वाचण्यासाठी हेडिंगवर क्लिक करा