राम मंदिर उद्घाटनासाठी 'या' साऊथ अभिनेत्यांना आमंत्रण

राम मंदिराच्या अभिषेक सोहळ्यासाठी रजनीकांत यांना निमंत्रित करण्यात आलं आहे.

अयोध्येतील शुभ कार्यक्रमासाठी चिरंजीवी यांनाही आमंत्रित आहे. 

मल्याळम सुपरस्टार मोहनलाल देखील 22 जानेवारीला अयोध्येला जाणार आहेत.

राम मंदिर उद्घाटन कार्यक्रमासाठी धनुषचं नावही पाहुण्यांच्या यादीत आहे.

कांतारा फेम अभिनेता ऋषभ शेट्टीलाही या ऐतिहासिक दिवसासाठी आमंत्रित करण्यात आलं आहे.

या ऐतिहासिक सोहळ्यासाठी प्रभासही अयोध्येला जाण्याची शक्यता आहे.

KGF फेम अभिनेता यश यालाही अयोध्येत आमंत्रित करण्यात आलं आहे.