नववर्षाचा पहिला दिवस सोमवार असल्यानं न चुकता करा या गोष्टी 

ज्योतिष तज्ज्ञांच्या मते, नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी काही उपाय केल्यास आपले जीवन आनंदी होऊ शकते आणि आर्थिक समस्याही दूर होऊ शकतात.

वर्ष 2024 चा पहिला दिवस हा सोमवार आहे आणि हा दिवस महादेवाच्या पूजेसाठी समर्पित आहे.

सोमवारी ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान आणि ध्यान करून भगवान शंकराची पूर्ण विधीपूर्वक पूजा केल्यास लोकांच्या जीवनातील संकटे, संकटे दूर होतात.

या दिवशी गंगाजलात काळे तीळ टाकून भगवान शिवाला अभिषेक करावा. असे केल्याने तुमचे नशीब बदलू शकते.

आर्थिक संकटातून बाहेर येण्यासाठी नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी लक्ष्मीची पूजा योग्य प्रकारे करावी. असे केल्याने आर्थिक संकटातून सुटका मिळू शकते.

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सूर्यदेवाला जल अर्पण करून त्यांची पूजा केल्यास सर्व संकटे दूर होतील आणि धनाची प्राप्ती होईल.

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी घराच्या अंगणात तुळशीचे रोप लावू शकता. असं केल्यानं घरात सकारात्मक ऊर्जा येते आणि सुख-समृद्धी कायम राहते.

वर्षाच्या पहिल्या दिवशी घरात तुळशीचे रोप लावले तर वर्षभर पैशाची कमतरता भासणार नाही. रोज संध्याकाळी तुळशीजवळ तेल-तुपाचा दिवा लावावा.

येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही