शिवाजी विद्यापीठात कचऱ्यापासून बनतंय खत

शिवाजी विद्यापीठात कचऱ्यापासून बनतंय खत

सध्याच्या काळात घनकचऱ्याचा प्रश्न हा गंभीर बनत चालला आहे. 

कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात जमा होणाऱ्या घनकचऱ्यावर खास उपाय योजण्यात आला आहे.  

घनकचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून गांडूळ खतनिर्मिती प्रकल्प कार्यान्वित करण्यात आला आहे.

विद्यापीठात बागबगीचे, अधिविभाग, हॉस्टेल्स आणि कॅन्टीनमधून मोठ्या प्रमाणात घनकचरा जमा होतो.

याच समस्येवर कौशल्य व उद्योजकता विकास केंद्राच्या माध्यमांतून उपाय शोधण्यात आला आहे.

कुलगुरू डी.टी. शिर्के यांच्या संकल्पनेतून घनकचऱ्यापासून गांडूळ खत निर्मिती केली जातेय. 

गेल्या चार महिन्यात जवळपास 25 ते 30 किलो गांडूळ खताची निर्मिती झालेली आहे.

सध्या या ठिकाणी गांडूळ खतनिर्मितीसाठी आठ बेड असून ही संख्या वाढवण्यात येणार आहे.