दूध दर कमी झाल्यामुळे गाईंचा खर्चही निघेना

देशातील बहुसंख्य लोक हे शेती क्षेत्राशी निगडीत आहेत. शेती क्षेत्र बेभरवशाचं असल्याने जोडधंदा म्हणून पशुपालन केलं जातं.

पशुपालन आणि त्यापासून दुग्ध व्यवसायातून चांगला नफा मिळण्याची शेतकऱ्यांना आशा असते. पण दुधाचे दर कमी झाले की शेतकऱ्यांवर दुहेरी संकट कोसळतं.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आडगाव बुद्रुक हे एक दुग्ध व्यवसाय करणारं गाव आहे.

90 टक्के लोक दुग्ध व्यवसाय करतात. पण गेल्या काही काळात दुधाचे दर कमी झाल्यानं महिन्याकाठी 21 लाखांचं नुकसान गावकऱ्यांचं होतंय.

छत्रपती संभाजीनगर शहरापासून 15 ते 20 किलोमीटर अंतरावर आडगाव बुद्रुक हे गाव आहे.

या गावाची लोकसंख्या ही सहा ते सात हजाराच्या दरम्यान आहे. गावातील 90 लोक  शेती आणि जोडीला दुग्ध व्यवसाय करतात.

प्रत्येक शेतकऱ्याकडे जवळपास 5 ते 10 गाई आहेत. त्यातून गावात दररोज 7 हजार लिटर दूध हे संकलित होतं.

सध्या गाईच्या दुधाला 24 रुपये प्रति लिटर भाव मिळतोय. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत असून गाईंचा खर्चही निघत नाहीये.

शिवाजी विद्यापीठात कचऱ्यापासून बनतंय खत