अजय देवगण-रोहित शेट्टीची 33 वर्षांची मैत्री! 

अजय देवगण आणि रोहीत शेट्टी यांची तब्बल  33 वर्षांची मैत्री आहे. 

 "रोहितसाठी अजय त्याच्या मोठ्या भावासारखा आहे आणि यात कधीच बदल होणार नाही", असं स्वत: रोहीत शेट्टी म्हणाला होता. 

रोहित म्हणाला, "चित्रपटांपासून ते कार खरेदी करण्यापर्यंतच्या आयुष्यातील प्रत्येक निर्णयात मी अजयचा सल्ला घेतो." 

"रोहित त्याच्या प्रत्येक सिनेमाविषयी माझ्याशी चर्चा करतो", असं अजयनं एका मुलाखतीत सांगितलं होतं. 

"मी आज जो काही आहे त्यात अजयचा खूप मोठा वाटा आहे. माझ्या आयुष्यातील त्याची जागा कोणीच घेऊ शकत नाही", असं रोहीतनं सांगितलं आहे. 

अजय आणि रोहित यांनी आजवर जवळपास 10-15 सिनेमात एकत्र काम केलं आहे. 

एकमेकांच्या चांगल्या वाईट काळात दोघांनी एकमेकांची साथ दिली आहे. 

अजयनं एका मुलाखतीत सांगितलं होतं की, तो रोहीतच्या सिनेमाची स्क्रिप्ट वाचत नाही. तो थेट शुटींगसाठी उभा राहतो.