घरी कावळा येण्याचे शुभ अशुभ संकेत
तुमच्या घराच्या खिडकीत विविध प्रकारचे पक्षी येत असतील.
शहरांमध्ये तसेच ग्रामीण भागात सामान्यपणे दिसणारा पक्षी म्हणजे 'कावळा'.
काहीजण कावळा घरी आला तर नाक मुरडतात तर काहीजण त्याला दाणा पाणी टाकतात.
कावळा पक्षाला ज्योतिषशास्त्रात महत्व दिले जाते. कावळा घरी येण्याचे काही शुभ अशुभ संकेत जाणून घेऊयात.
जर कावळा सकाळी तुमच्या घराच्या खिडकीत किंवा छतावर येऊन बसला असेल तर समजा तुमच्या घरी कोणी पाहुणे येणार आहेत.
तुम्ही कामासाठी घरातून बाहेर जात असाल आणि कावळा तुमच्याकडे तोंड करून आवाज करत असेल तर तुम्हाला कामात यश मिळेल याचे हे चिन्ह आहे.
कावळ्याचा कळप तुमच्या घरावर येऊन बसला असेल तर हे अप्रिय घटनेचे लक्षण असू शकते.
घरात कावळा येऊन तो दक्षिणेकडे तोंड करून आवाज करत असेल तर ते पितृदोषाचे लक्षण असू शकते.
ज्योतिषशास्त्रानुसार जर घरी आलेल्या कावळ्यांना पाणी आणि अन्न दिल्यास जीवनात सकारात्मक परिणाम होतो.
ही माहिती इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे आहे. कोणतीही माहिती स्वीकारण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.
पुढील वर्ष सुट्ट्यांचं!
2024 मध्ये नोकरदारांना मिळणार तब्बल 129 सुट्ट्या
बातमी वाचण्यासाठी हेडिंगवर किल्क करा
बातमी वाचण्यासाठी हेडिंगवर किल्क करा