धावणं की चालणं आरोग्यासाठी काय जास्त फायदेशीर?
हिवाळ्यात अनेकजण व्यायाम करण्यासाठी सकाळी किंवा सायंकाळी घराबाहेर पडतात.
पण अनेकदा लोकांना प्रश्न पडतो की धावणे की चालणे शरीरासाठी जास्त फायदेशीर काय ठरतं?
चालणे आणि धावणे या दोन्ही गोष्टी तुमच्या आरोग्यावर अवलंबून असतात. हे दोन्ही अतिशय चांगले मानले जातात.
वजन कमी करण्याच्या दृष्टीकोनातून पाहिल्यास धावणे फायदेशीर ठरेल
तर फिट राहण्यासाठी चालणे तुमच्या करता फायद्याचे ठरते.
वेगवान चालण्यामुळे उच्च कोलेस्ट्रॉल, उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचा धोका कमी होतो. याशिवाय बद्धकोष्ठतासारख्या पोटाशी संबंधित आजारांपासूनही आराम मिळतो.
चालण्याने हृदयाशी संबंधित आजारांचा धोका कमी होतो.
चालण्याने तणावाची पातळी कमी होते आणि तणाव कमी होतो.
पोटाची चरबी कमी करण्यासाठी तुम्ही रोज सकाळी धावले पाहिजे.
धावण्याने कॅलरीज बर्न होतात ज्यामुळे वजन कमी होते आणि तुमचे स्नायू देखील मजबूत होतात.