घरीच बनवा रब चॉकलेब बॉल

घरीच बनवा रब चॉकलेब बॉल

नवीन वर्षात एखाद्या गोड डिशच्या शोधात असाल तर रब चॉकलेट बॉल एक उत्तम पर्याय आहे. 

छत्रपती संभाजीनगर येथील गृहिणी श्रुती क्षीरसागर यांनी रब चॉकलेट बॉलची रेसिपी सांगितली आहे. 

रब चॉकलेट बॉल बनवण्यासाठी केक बेस घ्यायचा किंवा रेडिमेड केक बेसची प्रीमिक्सही घेता येते. 

मैद्यापासून, रव्यापासून, बिस्किटांपासून देखील तुम्ही केकचा बेस हा तयार करून घेऊ शकता. 

आवडीनुसार चॉकलेट सिरप, चोको चिप्स, डार्क कंपाउंड चॉकलेट, स्प्रिंकल्स हे साहित्य लागतं. 

सर्वप्रथम जो तुम्ही केकचा बेस तयार केलेला आहे तो बेस छान क्रश करून घ्यायचा.

क्रंच येण्यासाठी चोको चिप्स घालावे आणि चॉकलेट सिरप घालून त्याचे छान गोळे करावे.

डार्क कंपाउंड चॉकलेट मेल्ट करून घ्यायचं आणि त्यात गोळे छान डीप करून घ्यायचे. 

एका बटर पेपरवर सर्व गोळे ठेवून त्यावर गार्निशिंगसाठी चॉकलेटची शेव, स्प्रिंकल्स टाकू शकता. 

पाच ते दहा मिनिटं फ्रीजमध्ये ठेवून (फ्रिजरमध्ये नाही) खाण्यासाठी घेऊ शकता. 

तेलाचा नव्हे हा तर उसाचा घाणा