पिंपरी-चिंचवडमधील चौघड्याचे स्वर अयोध्येत घुमणार

अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या भव्य श्रीराम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याची सध्या देशभर सुरू आहे.

लोकार्पणचा भव्य सोहळा 22 जानेवारीला होत आहे.

अयोध्येत 22 जानेवारीला होणार्‍या श्रीराम मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याकरता पिंपरी-चिंचवड येथील चौघडा वादक रमेश पाचंगे यांना विशेष निमंत्रित करण्यात आले आहे.

पाचंगे यांना मिळालेल्या या निमंत्रणाने शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

या सोहळ्यात पाचंगे 45 देशातील विशेष निमंत्रितांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समोर चौघडा वादन करणार आहेत.

सनई चौघडा हा मंगलकार्याचे प्रतीक. आजच्या डिजिटल युगात या वाद्याचा निनाद मोबाईल किंवा सीडीमध्ये जरी बंदिस्त झाला.

पण आजही सनई चौघडा, ताशा, संबळ सारख्या मंगल वाद्यांचा सांस्कृतिक ठेवा पाचंगे कुटुंबाने जपला आहे.

त्यामध्ये एक नाव प्रकर्षाने घ्यावे लागेल ते म्हणजे चौघडा सम्राट रमेश पाचंगे यांचे.

पांचंगे कुटुंबात जयाजी पाचंगे यांनी ही परंपरा सुरू केली आणि आता त्यांचे नातू रमेश पाचंगे ही कला गेल्या 40 वर्षांपासून पुढे नेत आहेत.

श्रीराम विष्णूचा अवतार, मग लक्ष्मण कोणाचा अवतार?