ज्योती मावशींच्या जिद्दीला तुम्हीही कराल सलाम

ज्योती मावशींच्या जिद्दीला तुम्हीही कराल सलाम

एखाद्या महिलेने दृढ निश्चय केल्यास वय किंवा आजारही अडथळा ठरत नाही. 

मुंबईतील ज्योती पेडणेकर यांनी हेच दाखवून दिलं असून त्या अनेकांसाठी प्रेरणा ठरत आहेत. 

52 वर्षीय ज्योती मावशींना 15 वर्षांपूर्वी अर्धांगवायूचा झटका आला आणि डावा हात निकामी झाला. 

अचानक काम बंद आणि आजारपणाचा खर्च यामुळे घरची आर्थिक स्थिती बिकट झाली. 

मुळच्या मालवणी असणाऱ्या ज्योती मावशींना स्वयंपाक कौशल्यानं बळ दिलं. 

भांडूप येथील राजेशाही गोमंतक या हॉटेलमध्ये त्या अस्सल मालवणी, कोल्हापुरी पदार्थ बनवू लागल्या. 

अर्धांगवायूने एक हात निकामी झाला असतानाही त्या एका हाताने उत्तम मालवणी पदार्थ बनवतात. 

मावशींच्या हातच्या चवीमुळे रोज 250 ते 300 प्लेट विकल्या जातात असं हॉटेलचे मालक सांगतात.