मटणामधील सर्वात पौष्टिक भाग कोणता असतो?

भारतात अनेकजण आवडीने मांसाहार करतात. यात प्रामुख्याने चिकन, मटण आणि मासे यांचा समावेश असतो.

मांसाहारी लोकांमध्ये मटण म्हणजेच लाल मांस खाण्याचे देखील अनेक शौकीन आहेत.

100 ग्रॅम मटणात 33 ग्रॅम प्रोटीन असतं. यासोबतच यात आयर्न, झिंक आणि व्हिटॅमिन बी12 चं प्रमाणही खूप चांगलं असतं.

आरोग्य तज्ज्ञ मटणाला, व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि चांगल्या दर्जाच्या प्रोटीनचा उत्तम स्रोत मानतात.

नियमित मटण खाल्लाने शरीरात ऊर्जा आणि शक्ती टिकून राहते.

डॉ. अनुप गायकवाड यांनी या प्रश्नाचं उत्तर देत सांगतात की, तुम्ही ज्या शेळीचं किंवा बोकडाचं मांस खरेदी करत असाल त्याचं वय लक्षात घ्यावं.

संबंधित प्राणी जास्त लहान किंवा जास्त म्हातारा नसावा.

गुलाबी रंगाचं मांस सर्वोत्तम असतं. मटण खरेदी करताना त्यात मांस आणि हाडांचं प्रमाण 70:30 असेल याची खात्री करा.

तुम्हाला मटणाची उत्तम चव आणि पौष्टिकता हवी असेल तर शेळी किंवा बोकडाचे पुढचे पाय, शोल्डर, छाती, गळा, बरगड्या आणि यकृताचा भाग खरेदी केला पाहिजे.

मटण करीसाठी प्राण्याची मांडी हा सर्वोत्तम भाग असतो. त्यात थोडा यकृताचा भाग टाकल्यास त्याची चव आणखी वाढते.

मांडीमध्ये हाडं आणि मांस दोन्हींचं प्रमाण चांगलं असतं.

मांस खरेदी करताना, फक्त लाल भाग खरेदी केला पाहिजे. पांढरा भाग दुकानदाराकडून वेगळा करून घ्यावा.

पांढरा भाग फॅटयुक्त असतो. तो जास्त प्रमाणात खाल्ल्यास शरीरात फॅट वाढतं.

बातमी वाचण्यासाठी हेडिंगवर क्लिक करा