20 रुपयांत मिळवा 2 लाखांचं इन्शुरन्स, पण कसं?
प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना (PMSBY)एक सरकारी विमा योजना आहे.
PMSBY चा उद्देश लोकांना कठीण काळात मदत करणे हा आहे.
यात केवळ 20 रुपये वार्षिक गुंतवणूक करुन तुम्ही 2 लाखांचा विमा कव्हर मिळवू शकता.
ही योजना केंद्र सरकारने 2015 मध्ये लॉन्च केली होती.
याचा फायदा 18 ते 70 वर्षांची कोणतीही व्यक्ती घेऊ शकते.
PMSBY पॉलिसीचा प्रीमियम थेट बँक अकाउंटमधून कट केला जातो.
या योजनेत 1 जून, 2022 पूर्वी केवळ 12 रुपये प्रीमियम होता.
नंतर या प्रीमियमची रक्कम वाढून 20 रुपये करण्यात आली.
तुम्ही कोणत्याही बँकेत जाऊन PMSBY साठी अप्लाय करु शकता.