टॉयलेटच्या दुर्गंधीवर हे आहेत अगदी स्वस्त आणि प्रभावी उपाय!

जर तुम्हाला तुमच्या बाथरूम, टॉयलेटमधून दुर्गंधी येत असेल तर तुम्ही या टिप्स फॉलो करू शकता. अगदी कमी पैशात तुम्हाला चांगला परिणाम मिळेल. 

बाथरूम, शौचालय हा घराचा एक भाग आहे. म्हणून दोन्ही वेळोवेळी स्वच्छ केले पाहिजेत. 

नाहीतर घरात कोणी पाहुणे आले की त्याच्या दुर्गंधीमुळे लाजिरवाणी परिस्थिती निर्मण होते. 

एकदा शौचालय वापरल्यानंतर लगेच परत दुसृया कोणालातरी जाण्यात संकोच वाटू शकतो. कारण तेथून दुर्गंधी येत असते. 

लोक म्हणतात की एका व्यक्तीने शौचालय वापरल्यानंतर, शौचालयाचा वास जाईपर्यंत थांबणे चांगले.

या टिप्स फॉलो केल्यास एअर फ्रेशनरवर पैसे खर्च करण्याची गरज नाही. 

बाथरूम किंवा टॉयलेटमध्ये एक्झॉस्ट फॅन बसवावा. हे दुर्गंधी कमी करण्याचे काम करते. 

टॉयलेट सीटवर बसण्यापूर्वी ते एकदा फ्लूसह केले पाहिजे. वास निघेपर्यंत असेच ठेवा. 

बाथरूममध्ये ओले कपडे ठेवू नका. शौचालय वापरल्यानंतर ते पूर्णपणे फ्लश करण्यास विसरू नका. 

टॉयलेट सीट व्यवस्थित स्वच्छ करावी. अन्यथा दुर्गंधी निर्माण होईल. त्यामुळे शौचालयाचा प्रत्येक कोपरा स्वच्छ करणे आवश्यक आहे. 

एका कपमध्ये कॉफी पावडर टाका आणि त्यात गरम पाणी घाला. हे मिश्रण रात्री टॉयलेटमध्ये ठेवा आणि सकाळी धुवा. यामुळे शौचालय स्वच्छ राहील.