पुण्यात चक्क निळ्या तांदळाची शेती

अलिकडे काही शेतकरी आपल्या शेतात नव नवे प्रयोग करताना दिसतात. पुणे जिल्ह्यातील मावळ मुळशी भागात इंद्रायणी तांदळाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते.

आता येथील शेतकऱ्यानं इडोनेशिया, मलेशिया, थायलंड सारख्या देशात पिकणाऱ्या निळ्या तांदळाचे पीक घेण्याचा प्रयोग केला आहे.

चिखलगावचे शेतकरी लहू फाले यांनी आपल्या शेतात निळा भात पिकवलाय. 

अगदी कमी कालावधीत हा भात तयार झाला असून या तांदळाला पुणेकरांचा चांगला प्रतिसाद मिळतोय.

मुळशी तालुक्यातील चिखलगाव येथील प्रयोगशील शेतकरी लहू फाले यांनी खरीप हंगामात निळ्या भाताची लागवड केली होती.

त्याचा तांदूळ निळसर गडद जांभळ्या रंगाचा आहे. हा भात मलेशिया, थायलंड येथेच उत्पादित होतो.

याचे वैशिष्ट्य म्हणजे याला सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केला आहे. त्यामुळे बाजारात त्याला अधिक मागणी आहे.

230 झाडांतून शेतकरी लखपती!