Vastu Tips: वास्तूदोष घालवण्यासाठी कापूर असा वापरावा

घर असो किंवा मंदिर पूजा करताना कापूर नक्कीच वापरला जातो.

वास्तुशास्त्रात कापूरशी संबंधित अनेक उपाय सांगण्यात आले आहेत.

ज्योतिषाचार्य पं. पंकज पाठक यांनी दिलेल्या माहितीनुसार कापूराचे फायदे जाणून घेऊ.

या उपायांनी वैवाहिक जीवन सुखी होते आणि धनाची प्राप्ती होते.

स्वयंपाकघर साफ केल्यानंतर एका कोपऱ्यात छोट्या भांड्यात थोडा कापूर ठेवा.

कापूर जाळताना त्यासोबत दोन लवंगा जाळाव्या. असं केल्याने नोकरी आणि व्यवसायात प्रगती होईल.

घराच्या आग्नेय दिशेला रोज थोडा कापूर जाळावा.

झोपताना उशीखाली कापूर ठेवावा आणि सकाळी जाळून टाका.

असे केल्याने तुमच्या घरात शांतता राहील आणि पती-पत्नीमधील प्रेम वाढेल.