मालदीवपेक्षा भारी, भारतातील 5 समुद्रकिनारे

भारताला 7516.6 कि. मी. लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे.

भारताच्या तीनही बाजू या समुद्राने वेढलेल्या आहेत.

गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, ओडिसा, पश्चिम बंगाल हे राज्य तर अंदमान-निकोबार, दिव-दमण आणि लक्ष्यद्वीप हे केंद्रशासित प्रदेश किनारपट्टीला जोडले गेलेले आहेत.

लक्षद्वीप  : लक्षद्वीप हा भारताचा सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश असून भारताच्या दक्षिण पश्चिम किनारपट्टीवरून 200 ते 440 मीटर दूर आहे.

लक्षद्वीपमधील 36 बेटांपैकी 6 बेटांवर पर्यटकांना येण्याची परवानगी आहे. याचे टूर पॅकेज 30 हजारांपासून सुरु होते.

अंदमान आणि निकोबार बेटे बंगालच्या उपसागराच्या जवळ भारतीय मुख्य भूभागाच्या दक्षिण-पूर्वेस आहेत.

अंदमान आणि निकोबार बेटांवर अनेक पर्यटन आणि ऐतिहासिक स्थळे असून हे ठिकाण पर्यटन, जलक्रीडा आणि समुद्रकिनारी सहलीसाठी योग्य आहे.

अंदमान बेटाचे टूर पॅकेज साधारणपणे 40 हजारांपासून सुरु होते.

महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग हा जिल्हा सागरी पर्यटनासाठी अतिशय प्रसिद्ध आहे.

सिंधुदुर्ग हे ठिकाण अनेक ऐतिहासिक किल्ले, वास्तू, निळे पाणी आणि जलक्रीडेसाठी प्रसिद्ध आहेत. याचे टूर पॅकेज 10 हजारांपासून सुरु होते.

मुनरो बेट हे केरळमधील कोल्लमपासून 27 किलोमीटर अंतरावर आहे. मुनरो हे बेट 8 बेटांनी मिळून तयार झाले आहे.

मुनरो बेट हे ऐतिहासिक ठिकाण आणि स्वच्छ समुद्र किनाऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. याचे टूर पॅकेज 30 हजारांपासून सुरु होतात.

हिवलॉक बेट हे हनीमून डेस्टिनेशन म्हणून प्रसिद्ध आहे.

हिवलॉक बेट येथील खास पर्यटनस्थळांमध्ये पांढरी वाळू असणाऱ्या राधा नगर बीचचा आणि एलिफंट बीचचा समावेश आहे. याचे टूर पॅकेज साधारणपणे 30 हजारांपासून सुरु होते.