राम मंदिरात

 प्रवेश कसा मिळणार?

प्राण प्रतिष्ठेच्या दुसर्‍या दिवसापासून म्हणजे 23 जानेवारीपासून लोकांसाठी प्रवेश उपलब्ध असेल.

22 जानेवारीला अयोध्येत येण्याचा प्रयत्न करू नका, असे पंतप्रधानही म्हणाले होते.

पंतप्रधान म्हणाले की, भारतवासियांनी आपल्या घरा-घरात श्री रामज्योत लावावी.

रामजन्मभूमी मंदिरात सध्या 'आरती' पासचे बुकिंग सुरू झाले आहे.

आरती दिवसातून 3 वेळा केली जाईल (सकाळी 6:30, दुपारी 12:00 आणि संध्याकाळी 7:30)

आरतीसाठी ट्रस्टने तयार केलेला पास आवश्यक आहे.

आरतीसाठी पास तुम्हाला ऑनलाइन घ्यावा लागेल.

त्यासाठी श्री राम जन्मभूमि तीर्थ क्षेत्रच्या वेबसाइट srjbtkshetra.org वर जा.

आपला मोबाईल क्रमांक एंटर करून OTP द्वारे लॉग इन करावे लागेल.

नंतर 'आरती' सेक्शनवर क्लिक करा.

तारीख, आरतीचा प्रकार निवडा ज्यावेळात तुम्ही तिथं पोहचू शकता.

तुमचे नाव, पत्ता, फोटो, मोबाईल नंबर प्रविष्ट करावा लागेल.

सगळी प्रक्रिया केल्यानंतर पास मंदिराच्या काउंटरजवळ प्राप्त होईल.