भारतातील सर्वात मोठा जमीनदार कोण?

सध्या देशातील जमिनींचे भाव गगनाला भिडले आहेत.

तेव्हा देशातील सर्वात जास्त जमीन कोणाकडे आहे असा प्रश्न अनेकांना पडतो.

तर याच उत्तर आहे भारत सरकार.

गव्हर्नमेंट लँड इन्फॉर्मेशन सिस्टम (GLIS) च्या वेबसाइटवर दिलेल्या आकडेवारीनुसार, फेब्रुवारी 2021 पर्यंत, भारत सरकार 15,531 चौरस किलोमीटर जमिनीचे मालक होते.

भारत सरकारची ही जमीन 51 मंत्रालये आणि 116 सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांकडे आहे.

भारत सरकारनंतर दुसऱ्या क्रमांकाचा मोठा जमीन मालक कॅथोलिक चर्च ऑफ इंडिया हे आहेत.

कॅथोलिक चर्च ऑफ इंडिया ही संस्था देशभरात हजारो चर्च, ट्रस्ट, धर्मादाय संस्था, शाळा, महाविद्यालये आणि रुग्णालये चालवते.

जमीन मालकीच्या बाबतीत वक्फ बोर्ड भारतात तिसऱ्या क्रमांकावर येतात.

वक्फ बोर्ड ही स्वायत्त संस्था असून ते देशभरात हजारो मशिदी, मदरसे आणि कब्रस्तान चालवते आणि या जमिनींचे मालक आहेत.

बातमी वाचण्यासाठी हेडिंगवर क्लिक करा