माजी सैनिक करतोय शेळीपालन!

सध्याच्या काळात शेती आणि शेतीपुरक व्यवसायांपेक्षा नोकरीकडे तरुणांचा कल अधिक आहे. पण सध्याच्या काळात नोकरी मिळणे कठीण झाले आहे.

तेव्हा काही तरुण आधुनिक पद्धतीनं शेती आणि पशुपालन करून चांगला नफा मिळवत आहेत.

सातारा जिल्ह्यातील जवान राजेंद्र लक्ष्मण गायकवाड यांनी 17 वर्ष भारतीय सैन्यात सेवा बजावली.

आता त्यांनी शेळीपालन सुरू के असून त्यातून ते लाखोंची कमाई करत आहेत.

जिल्ह्यातील चिंचणी येथील राजेंद्र गायकवाड हे भारतीय सैन्यात होते. 17 वर्षे सेवा करून ते निवृत्त झाले.

निवृत्तीनंतर त्यांनी शेती करण्याचा निर्णय घेतला. शेतीला पुरक व्यवसाय म्हणून त्यांनी शेळीपालनाचा निर्णय घेतला. 

शेळीपालनाचा व्यवसाय सुरू करताना त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. पण एक सैनिक असल्यामुळे हार मानायची नाही असा निश्चय त्यांनी केला.

आज त्यांच्याकडे लहान मोठ्या शेळ्यांची संख्या 36 वर पोहोचली असून लाखोंची कमाई करत आहेत.

तैवान पेरूने शेतकरी लखपती!