पिंपळाच्या पानांचे हे उपाय जीवनात करतील चमत्कार

पिंपळाच्या झाडाची यथायोग्य पूजा केल्यानं दुःख आणि दारिद्र्य दूर होतात.

ज्योतिषी पंकज पाठक यांनी याबाबत दिलेली माहिती जाणून घेऊ.

पिंपळाच्या पानांच्या काही उपायाने व्यक्तीला जीवनात यश मिळते.

ग्रहांचे वाईट प्रभाव दूर होऊन जीवनात सकारात्मक परिणाम प्राप्त होतात.

रात्री झोपताना उशीखाली पिंपळाचे पान ठेवा, त्यामुळे आर्थिक लाभ होतो.

शनिवारी आणि मंगळवारी पिंपळाच्या झाडाखाली बसून हनुमान चालिसाचे पठण करावे.

या उपायामुळे संकटमोचक हनुमानाची तुमच्यावर कृपा राहील.

कर्जामुळे त्रस्त असाल तर मंगळवारी पाकिटामध्ये पिंपळाचे पान ठेवा.

एखादा गंभीर आजार असेल तर रात्री झोपण्यापूर्वी उशीखाली पिंपळाचे पान ठेवावे.

सोमवारी किंवा कोणत्याही विशेष तिथीला पिंपळाच्या झाडाखाली शिवलिंगाची स्थापना करा.

असे केल्याने माणसाला सुख-शांती मिळते.