UPSC परीक्षेत शेतकरी पुत्र राज्यात अव्वल

UPSC परीक्षेत शेतकरी पुत्र राज्यात अव्वल

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत जालन्यातील शेतकरी पुत्रानं मोठं यश संपादन केलंय. 

आनंदगाव येथील अजिंक्य शिंदे महाराष्ट्रात अव्वल आला असून देशात 102 रँक मिळाली आहे.

अजिंक्यला युपीएससीमधून डिस्ट्रिक्ट मायनिंग ऑफिसरचं पद मिळणार आहे. 

अजिंक्यचं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेत झालं तर ज्ञानतीर्थ विद्यालयात बारावीचं शिक्षण घेतलं. 

कुटुंबाची जबाबदारी सांभाळत पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात त्यानं पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. 

ज्ञानतीर्थ विद्यालयातील शिक्षक नितीन लोहट यांच्या मार्गदर्शनामुळे अजिंक्य युपीएससीकडे वळला. 

अजिंक्यला शिक्षणासाठी खंबीरपणे पाठबळ देणाऱ्या भावाचं कोविड काळात निधन झालं. 

प्रतिकुल परिस्थितीवर मात करत अजिंक्यने यश मिळवल्याने त्याचं सर्वत्र कौतुक होतंय.

शिक्षकांचा प्लास्टिक बंदीसाठी अनोखा फंडा

शिक्षकांचा प्लास्टिक बंदीसाठी अनोखा फंडा