काय सांगता, जास्त थंडीमुळे येतं डिप्रेशन?

देशभरात सध्या पडलीये कडाक्याची थंडी.

या थंडीसह लोक  हिवाळी आजारांनीही आहेत ग्रस्त.

अशा परिस्थितीत दुपारी अंगाला घाम येतोय पण ऊन काही मिळत नाहीये.

त्यामुळे शारीरिक आजारांसह लोकांना मानसिक आजारांचाही करावा लागतोय सामना.

या आजारपणाला म्हणतात, 'विंटर ब्लूज'.

त्यामागचं मुख्य कारण आहे डी जीवनसत्त्वाचा अभाव, जे प्रामुख्यानं मिळतं ऊन्हातून.

या आजारात चिडचिड होते, काही कारण नसताना दु:ख होतं. मन अस्थिर राहतं आणि घाबरल्यासारखं वाटतं.

या आजारापासून वाचण्यासाठी दररोज करावा व्यायाम आणि योगासनं.  शिवाय जास्तीत जास्त वेळ  पिवळ्या प्रकाशात राहावं.